राऊतांनी '१७०'चा आकडा कसा काढला मला माहीत नाही : शरद पवार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |




 


नवी दिल्ली : शिवसेना-भाजपकडे बहुमत आहे, त्यांनी सरकार स्थापन करावे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. संजय राऊत यांनी आमच्याकडे १७० चा आकडा असल्याचा दावा केला होता, त्याबद्दल बोलताना पवार म्हणाले. सत्ता स्थापनेबाबतच्या शक्यतेबाबत सांगताना राष्ट्रवादीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यावर ते बोलत होते. 

 

सोनिया गांधी यांच्या भेटीबद्दल सांगताना शरद पवार म्हणाले, "राज्यातील कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या पुढील कामकाजाबद्दल आढावा घेण्यासाठी ही भेट घेतली होती. आणखी एकदा ही भेट होणार आहे." यावेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या सरकार स्थापनेबद्दलच्या शक्यतेबद्दल विचारले असता शिवसेनेने अजून कोणताच प्रस्ताव पाठवले नसल्याचे आणि उद्धव ठाकरेंसोबत कोणतेच बोलणे झाले नसल्याचे ते म्हणाले. महायुतीला जनतेने कौल दिला असून लवकरच सरकार स्थापन झाल्यावर शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे पवार म्हणाले. यावेळी माजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रफुल पटेल उपस्थित होते.




 

@@AUTHORINFO_V1@@