राज्यपालांच्या भेटीनंतर राऊत म्हणतात, सत्तापेचाला आम्ही जबाबदार नाही !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राज्यातील सत्तापेचाला आम्ही जबाबदार नाही, सर्वोत मोठ्या पक्षाने सत्ता स्थापन करावी, असे आवाहन त्यांनी राज्यपालांना करण्यास सांगितले. ही भेट कोणत्याही राजकीय स्वरुपाची नव्हती, असे सांगितले.

 

रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे यांचे 'फटकारे' उद्धव ठाकरे यांचे 'पाहावा विठ्ठ्ल' ही पुस्तके यावेळी राज्यपालांना भेट देण्यात आली. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली ही भेट ही राजकीय भेट नसल्याचा दावाही राऊत यांनी केला. यावेळी महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पेचाबद्दल विचारले असता यासाठी आम्ही जबाबदार नसल्याचे त्यांनी म्हटले.





@@AUTHORINFO_V1@@