टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत बांग्लादेशची भारतावर १-० ने आघाडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2019
Total Views |



भारत-बांग्लादेश यांच्यात काल नवी दिल्लीत झालेला पहिला टी-ट्वेंटी क्रिकेट सामना बांग्लादेशने सात गडी राखून जिंकला. त्यामुळे तीन सामन्यांच्या भारत आणि बांग्लादेश यांच्यामधील मालिकेत बांगलादेशने सध्याच्या परिस्थितीनुसार १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने दिलेले १४९ धावांचे आव्हान बांग्लादेशने विसाव्या षटकाचे तीन चेंडू शिल्लक असतानाच तीन गड्यांच्या मोबदल्यात पार करुन विजय मिळवला तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या गुरुवारी होणार आहे.

दरम्यान काल झालेल्या सामन्यातील बांग्लादेशच्या विजयाचे सर्वात जास्त श्रेय मुशफिकर रहीमला जाते कारण त्याने केलेल्या ६० धावांचा संघाला जिंकण्यासाठी खूपच उपयोग झाला. तर भारतीय संघाने देखील आपल्या बाजूने प्रयत्न करत असताना दीपक चहर, के खलील अहमद आणि यजुवेन्द्र चहल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पूर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १४८ धावा केल्या. तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. आयसीसीने दोन वर्षांसाठी बंदी घातलेल्या शाकिब अल हसनशिवाय बांगलादेश खेळत आहे.

@@AUTHORINFO_V1@@