'डॉ. प्रियांका' प्रकरणी कलाकारांनी व्यक्त केला संताप

    30-Nov-2019
Total Views |



गुरुवारी हैद्राबादमध्ये झालेल्या महिला डॉक्टर हत्याप्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. सोशल मीडियावरूनही 'डॉ. प्रियांका'ला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणी होत आहे. बलात्काऱ्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी प्रत्येक स्तरातून केली जात असतानाच कलाकारांनीही आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त केला. 

'ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे. डॉ.प्रियांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली. जो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो.', अशा तिखट शब्दांत अभिनेता सुबोध भावेंनी आपला संताप व्यक्त केला.




'दरवर्षी महिला सुरक्षेचा प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत उठतो.', असं म्हणत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेही महिलांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली. सिद्धार्थ जाधव, अक्षय कुमार, फरहान अख्तर यांनीही ट्विटरच्या माध्यमातून या प्रकरणी आपला राग व्यक्त केला.