हैद्राबाद सामुहिक अत्याचार प्रकरणी तेलंगणा गृहमंत्र्यांचे बेताल वक्तव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |




हैद्राबाद : काल हैद्राबादमध्ये पशुवैद्यकीय डॉक्टर असणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर अपराध्यांनी तरुणीचा मृतदेह जाळल्याची धक्कादायक घटना हैद्राबादमध्ये घडली. याप्रकरणी पोलीस यंत्रणा तपास करत असून आत्तापर्यंत ४ आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात येत असतानाच तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांनी वादग्रस्त विधान केले. पीडित तरुणी डॉक्टर असून सुशिक्षित होती. पोलिसांना फोन करण्याऐवजी तिने कुटुंबाला फोन करणं दुर्दैवी आहे. १०० नंबरवर फोन करण्याऐवजी तिने आपल्या बहिणीला फोन केला", असे म्हणत त्यांनी पीडित तरुणीलाच घटनेला जबाबदार धरले. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचा देखील सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात आला. राज्याच्या गृहमंत्री पदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीकडून केल्या गेलेल्या या बेताल वक्तव्याचा देशभरातून निषेध नोंदविण्यात आला. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी दिल्लीमध्ये लोक रस्त्यांवर उतरले असून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. यावेळी निदर्शने करत असलेल्या अनु दुबे नावाच्या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी महिला आयोगाने पोलीस उपायुक्तांना नोटीस बजावली आहे


तेलंगणा पोलिसांनी याप्रकरणी चार आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद
, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला. पोलिसांनी सांगितलं आहे की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.


पीडितेवर अत्याचार हा आरोपींचा पूर्वनियोजित कट

आरोपींच्या चौकशीतून हा प्रकार पूर्वनियोजित कट असल्याचे उघड झाले. आरोपींनी पीडितेच्या गाडीतील हवा आधीच काढून टाकली होती. स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने या तरुणीला निर्जन स्थळी नेण्यात आले. ओरडू नये याकरिता तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्यामुळे तिचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. मृत्यूनंतर तरुणीचा मृतदेह नष्ट करण्यासाठी आरोपीनी निर्जन ठिकाणी नेऊन तो जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.ही निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती आहे. सोशल मीडियापासून ते सगळीकडेच याप्रकऱणी आवाज उठवण्यात येत असून आरोपींना कडक शिक्षा केली जावी अशी मागणी होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@