सौरभ वर्मा आणि ऋतुपर्णा दास आज उपांत्य फेरीतले सामने खेळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |


 

 

लखनौ येथे सुरु असलेल्या सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज सौरभ वर्माचा सामना कोरियाच्या हियो क्वांग ही बरोबर होणार आहे. उपांत्य पूर्व सामन्यात त्याने काल थायलंडच्या कनलावत वितिदसरनचा २१-१९, २१-१६, असा पराभव केला. दरम्यान किदंबी श्रीकांत मात्र उपांत्य पूर्व फेरीत जाण्यास अपयशी ठरला. जागतिक क्रमवारीत ३६ व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय खेळाडूविरुद्ध ४१ व्या क्रमांकावर असलेल्या खेळाडूशी झालेला हा पहिला सामना होता.


महिला एकेरीत ऋतुपर्णा दासचा सामना थायलंडच्या फिट्टायापोर्न चैवानशी होईल, उपांत्य पूर्व फेरीत ऋतुपर्णाने श्रुती मुंदडाचा २४-१६, २१-१०, २१-१९ असा पराभव केला. ऋतुपर्णाचा पुढील सामना आज थायलंडच्या फिटायापोर्ण चाइवान हिच्याशी होणार आहे. त्यामुळे आता या दोन्ही सामन्यांकडे भारतीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@