जितेंद्र आव्हाड यांचा नंबर चुकला; सोळाच्या ऐवजी थेट वीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |






मनसे, एमआयएम, सीपीआय तटस्थ 


मुंबई : विधानसभेत आज विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यावेळी सभागृहाच्या सदस्यांना एक-एक करून उभे करून बहुमत मोजण्यात आले. जितेंद्र आव्हाड हे सोळाव्या क्रमांकावर उभे होते. मात्र त्यांच्या लक्षात न आल्यामुळे क्रमांक उच्चाराच्या वेळीस त्यांनी वीस क्रमांक उच्चारला.


तसेच ६२ आणि ६३ क्रमांकातही गडबड झाली. शंभराव्या क्रमांकावर असलेल्या आमदाराने ७८ क्रमांक उच्चारल्यामुळे सभागृहात गडबड झाली होती. सभागृहाचे कामकाज संविधानाला धरून चलत नसल्याचे म्हणत भारतीय जनता पक्षाने सभात्याग केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनाबाहेर पत्रकार परिषद घेतली. आजवर महाराष्ट्राच्या इतिहासात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा विश्वासदर्शक ठराव मांडला गेला नाही, हि बाब देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.

@@AUTHORINFO_V1@@