झारखंडमध्ये नक्षली हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |



झारखंड : झारखंडच्या गुमला जिल्ह्यात शनिवारी सकाळी नक्षलवादी हल्ला झाला. गुमला जिल्ह्यातील बिशुनपूरमध्ये नक्षलवाद्यांनी पूल उद्ध्वस्त केला आहे. मात्र या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

झारखंड विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात आज १३ जागांवर मतदान होत आहे. या हल्ल्यामुळे मतदानावर परिणाम झालेला नसून मतदान अजूनही सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. या निवडणुकांना नक्षलवाद्यांचा विरोध होत असून, मतदान बंद पाडण्याच्या हेतून हा हल्ला करण्यात आला होता. पूल पाडल्याने मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल आणि मतदानावर त्याचा परिणाम होईल या विचाराने हा हल्ला झाला. मात्र मतदारांनी या हल्ल्याला न भिता मतदान प्रक्रिया सुरु ठेवली आहे.

@@AUTHORINFO_V1@@