बहुमत नसल्यानेच सरकारने हंगामी अध्यक्ष बदलला : निलेश राणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |



 



मुंबई
: आज महाविकासआघाडी सरकारची विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत मांडला जाणार आहे. आम्ही बहुमत सिद्ध करणारच असा दावा महाविकासआघाडीचे नेते करत आहे. परंतु,या सरकारकडे बहुमत नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. तसेच हे सरकार वारंवार घटनाबाह्य काम करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात येत आहे. 'बहुमत नसल्यानेच सरकारने हंगामी अध्यक्ष बदलला’ असल्याची टीका भाजपचे निलेश राणे यांनी केली. तसेच तुमच्याकडे बहुमत आहे तर बहुमतचाचणी गुप्त घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आपले आमदार फुटण्याची भीती असल्यानेच महाविकासआघाडी गुप्त मतदानाला सामोरे जाण्यासाठी घाबरत आहे हे स्पष्ट आहे,” असेही ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@