'मंदिर व्यवस्थापन' विषयाचा अभ्यासक्रमात समावेश आवश्यक : डॉ. सुरेश हावरे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |


 


कल्याण : छोट्या व्यवस्थापनातून मंदिरांमध्ये मोठे बदल होऊ शकतात. पण, त्यासाठी या विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. या ज्ञानासाठी 'मंदिर व्यवस्थापन' हा विषय विद्यालयीन अभ्यासक्रमात असणे आवश्यक असल्याचे मत शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी कल्याणमध्ये बोलताना व्यक्त केले. 'सुभेदारवाडा कट्टा'च्या 'प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमाले'तील दुसरे पुष्प गुंफताना डॉ. सुरेश हावरे बोलत होते. यावेळी मंचावर माजी आमदार नरेंद्र पवार, डॉ. आनंद कापसे, अण्णा वाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. हावरे यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. ते बोलताना म्हणाले की, "अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षा 'अन्न-वस्त्रे व विचार' अशी त्रिसूत्री अंमलात येणे अत्यावश्यक आहे. कारण, अन्न एका दिवसापुरते, तर वस्त्र वर्षाभरापुरते आणि विचार आयुष्यभरासाठी उपयोगी पडतात." या व्याख्यानमालेचेही डॉ. हावरे यांनी कौतुक केले. "मंदिरे ही गावाच्या व शहराच्या केंद्रस्थानी असल्याने मंदिरांच्या माध्यमातून शहरांमध्ये विकासकामे होणे अत्यावश्यक आहे," असे ते म्हणाले. यावेळी बोलताना आपला शिर्डी संस्थानाशी आलेला संबंधही त्यांनी श्रोत्यांना सांगितला.

 

पुढे ते म्हणाले की, "मंदिर व्यवस्थापन करताना भक्तांना तिथे काय त्रासाला सामोरे जावे लागते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर तेथील छोट्या-छोट्या गोष्टींचे नियोजनात्मक काम होणे आवश्यक असून सद्यस्थितीत मंदिरातून निर्माण होणारे निर्माल्य हे रोजगाराचे साधन झाले आहे. असे प्रत्येक ठिकाणी होणे गरजेचे आहे. तसेच मंदिरांच्या माध्यमातून एखादे समाजोपयोगी काम व्हावे, यासाठी शिर्डी संस्थानमध्ये रक्तदान शिबीर सुरू करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून साडेतीन लाख लोकांपर्यंत रक्त पोहोचवले जाते," अशी माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

 

रोजगारनिमिर्तीचे काम होऊ शकता...

 

मंदिर व्यवस्थापनाबाबत दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंना भेटून या विषयाचे महत्त्व समजावले आहे व ते हा विषय त्यांच्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास तयार आहेत, असेही ते म्हणाले. या विषयात रोजगारनिर्मितीचे निर्माण होऊ शकते. त्यामुळे या विषयाचा विचार करून काम होणे गरजेचे आहे.

@@AUTHORINFO_V1@@