तेलंगणा बलात्कार प्रकरण ; नराधमांना १४ दिवसांची कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली : तेलंगणामध्ये पशुवैद्यकीय डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना तेलंगणामधील शादनगर दंडाधिकाऱ्यांनी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मोहम्मद, आरिफ, नवीन, चिंताकुंता केशावुलू आणि शिवा अशी आहेत. सध्या भारतभर याचा निषेध केला जात आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व पाताळींमधून केली जात आहे.

 

४८ तासांमध्येच राज्यात मंदिराजवळ आढळला महिलेचा जळालेला मृतदेह

 

तेलंगणामधील सिद्दुला गुट्टा मंदिर परिसरात शुक्रवारी महिलेचा जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. हा परिसर आरजीआय एयरपोर्ट पोलिस स्टेशन अंतर्गत येतो. शम्शाबाद झोनचे डीसीपी प्रकाश रेड्डी यांनी सांगितले की, मंदीरपरिसरात मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना स्थानिक नागरिकांडून मिळाली. दरम्यान, लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न अपयशी ठरले. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात ३० ते ३५ वयातील महिला असल्याचे समोर आले. दरम्यान, महिलेने स्वतः आग लावून घेतली का, दुसऱ्याने आग लावली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

 

आरोपींना कठोर शिक्षा व्हावी म्हणून नागरिकांचे आंदोलन

 

शहरातील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले. शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिक आंदोलन केले. आरोपींवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली. या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी, मागणी आंदोलकाकडून करण्यात येत आहे. याबरोबरच आरोपींना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सहाय्य करणार नाही, असा निर्णय शादनगर बार असोशिएशनने घेतला आहे.

@@AUTHORINFO_V1@@