वाळूतील शिल्पे साकारणाऱ्या सुदर्शन पटनाईकला 'इटालियन गोल्डन सॅण्ड अवॉर्ड'

    03-Nov-2019
Total Views |






नवी दिल्ली
: इंडियन सॅण्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनाईक, ज्यांची जगभरात ओळख आहे. याच्या वाळूतील शिल्पांचे जगभरातून कौतुक होते. यंदाच्या प्रतिष्ठित इटालियन गोल्डन सॅण्ड अवॉर्ड २०१९साठी त्याची निवड झाली आहे. १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत इटली येथे होणार्या आंतरराष्ट्रीय स्कोर्राना सेंड नेटिविटी या कार्यक्रमादरम्यान त्यांना हा सन्मान देण्यात येणार आहे. पटनायक म्हणाले की, "प्रोमुओवी स्कोर्रानाचे अध्यक्ष विटो मारासियो यांनी पत्र पाठवून त्यांना या पुरस्कारासाठी केलेल्या निवडीबद्दल माहिती दिली. तसेच या सोहळ्यात सुदर्शन भारताचे प्रतिनिधीत्व देखील करतील.,"असे त्यांनी सांगितले. जगातील केवळ ८ कलाकारांना या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळते. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही ट्विटद्वारे सुदर्शनचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.