त्यांची दिव्यदृष्टी : ’राहूदे आदि’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2019   
Total Views |





माझा हट्ट म्हणजे हट्ट. तो हट्ट पूर्ण करण्यासाठीच तर लाखो मावळे आजपर्यंत पक्ष उभा करत होते. हो म्हणजे आताच नाही काही? माझ्या जन्माआधीपासून ते मला नेता बनवण्यासाठी काम करत असावेत. लोकांना काय? त्यांना वाटते, मी आयत्या बिळावर नागोबा आहे. पण तसे काही नाही. या घराण्यात जन्म घेणे हेच तर माझे मोठे कर्तृत्व.


देवाचं दर्शन घेतलं आणि निवडून आल्यावर अजमेर दर्ग्यावरही माथा टेकला
. गंगाजमना तहजीब दाखवली. पुरोगामी महाराष्ट्रात आणखी काय हवं आहे मुख्यमंत्री होण्यासाठी? राजा होण्यासाठी वंशपरंपरा लागते, ती पण आहे. मी आता शेता-बांधावरपण जातो. आता गावाच्या रगाड्यात मुंबईचे रात्रजीवन सुरू करण्याचा विचार मनात आलेला. त्यासाठी गावात मुंबई आणावी लागेल. बघू, त्यात काय इतकं? माझ्या हट्टासाठी पेंग्विन मुंबईत येऊ शकतात, सगळ्या जुन्याजाणत्या घाम काय रक्त गाळणार्‍या सैनिकांना लढाईपुरता ठेवून मीच सार्वभौम आहे, असे ठरू शकते, तर गावांमध्ये मुंबईपण येऊ शकते.



माझा हट्ट म्हणजे हट्ट
. तो हट्ट पूर्ण करण्यासाठीच तर लाखो मावळे आजपर्यंत पक्ष उभा करत होते. हो म्हणजे आताच नाही काही? माझ्या जन्माआधीपासून ते मला नेता बनवण्यासाठी काम करत असावेत. लोकांना काय? त्यांना वाटते, मी आयत्या बिळावर नागोबा आहे. पण तसे काही नाही. या घराण्यात जन्म घेणे हेच तर माझे मोठे कर्तृत्व. जाऊदे, या सगळ्यांमधून मला आमचे दूरदृष्टीचे संजय आवडतात. महाभारतातल्या संजयचे ते रिमेक म्हणजे पुर्नजन्मच आहे. ते वरळीला म्हणाले होते, मंत्रालय दूर नाही. ट्रम्प पण माझ्याशी चर्चा करायला येतील. लोकम्हणतील, ‘हाऊदी आदि? हाऊदी आदि?” त्यावेळी त्यांनी छानशा भुवया पण उडवल्या. वा, वा! त्यांचे ते वाक्य मनाला उभारी देऊन गेले. वाटले, विधानसभा नव्हे तर जगसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीमध्ये जगभरातले नेते उमेदवार म्हणून उभे आहेत. त्यात मी पण आहे आणि लोक म्हणतात, “हाऊदी आदि? हाऊदी आदि?” हं... पण भानावर आले तर कळले, अरे ही तर विधानसभा निवडणूक. म्हणजे महाराष्ट्राचंच राजकारण करायचं आहे? या राजकारणात अमेरिका कशाला पडेल? मग ते दिव्यदृष्टी असून असे का म्हणाले की, ट्रम्प माझ्याशी चर्चा करायला येतील, लोक म्हणतील, “हाऊदी आदि? हाऊदी आदि?...” काय म्हणता? जे नाही तेच ते बोलतात. त्यासाठीच त्यांना दिव्यदृष्टी आहे. काय म्हणता, त्यांना असे दिवसाउजेडी भास होतात? देवा मला तर आता ‘हाऊदी आदि’ ऐवजी “राहूदे आदि, राहूदे आदि,” असे बोलल्याचे भास होतायेत. काय म्हणता तेच त्यांच्या दिव्यदृष्टीत आहे?



हेच त्यांचे संस्कार
...!



देशात काही लोकांना बोलण्याचे अतिस्वातंत्र्य आहे
, नवे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे वक्तव्य. अगदी बरोबर. काहीही बरळा, त्या बरळण्याला काही लोक स्वातंत्र्याचे नाव देतात. कन्हैयाकुमार ते तमाम पुरोगामित्वाचा शिक्का मारलेले स्वघोषित बुद्धिवादी यातच मोडतात. देशाचे तुकडे तुकडे करू पाहणारे हे तुकडेबहाद्दर यांच्या तोंडात हजार विष्ठेचे बळ. त्यांच्या बोलण्याने कुत्र्याला नाही पण समाजातील काही विघातक शक्तींना बळ मिळते. असो. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हे स्वातंत्र्य जास्तच घेतात. समोरचा जिंकला तर इव्हीएमचा झोल, आपण जिंकलो तर आपले कर्तृत्व थोर. छगनरावांचा मुलगा हरला तरी जिंकलेल्या या बापाने काय म्हणावे, तर जनतेने भाजपची मस्ती उतरवली.



यांची जागा जेलमध्ये आणि नंतर आजारी पडले म्हणून दवाखान्यात
. पण ते काय म्हणतात तर, जनतेने मुख्यमंत्र्यांना जागा दाखवली. आता काय म्हणावे? याच पक्षाचे धनाजीराव. काय त्यांचे ते अश्लिल बोलणे आणि हावभाव. पण नाटकी रडारड करून तेही जिंकले. धरण भरणारे त्यांचे अजितदादाही असेच रडले आणि जिंकले. मी एकटाच राहिलो म्हणत या सगळ्यांचे आधारस्तंभ शरदराव रडले, भिजले तेही जिंकले. तर या निवडणुकीत या सगळ्यांनी बोलण्याचे, अति बोलण्याचे स्वातंत्र्य घेतले. पण निवडणुकीनंतरही तमाम माहेरवाशिणींचा अपमान करणारे एक विधान राष्ट्रवादी पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केले. त्या म्हणाल्या, “लेकीला म्हणजे पंकजा मुंडेंना सासरी पाठवल्याबद्दल परळीकरांचे धन्यवाद.” बोलणारी व्यक्ती फार तोलामोलाची नाही. पण ती वृत्ती घाणेरडी आणि विघातक आहे. वडिलांचा वारसा मुलीने चालवणे गैर आहे का? मुलीचे लग्न झाले म्हणजे तिचे माहेरपण मरते का? हे प्रश्न उभे राहतात. पण या प्रश्नाचे उत्तर देण्याचीही धमक त्या वृत्तीत नाही. कारण, रूपाली यांच्या मालकीणबाईही सुळेबरोबरच पवारही नाव लावतात आणि म्हणूनच जिंकतात. सरन्यायाधीशांनी सांगितल्याप्रमाणे बोलण्याचे अतिस्वातंत्र्य घेणारे हे लोक. या लोकांनी देशप्रेम, समाजनिष्ठा, मानवी मूल्यांच्या संवेदनशीलतेतून बोलण्याचे ठरवले तर? देशाचे, समाजाचे भले होईल. पण, त्याची सुतराम शक्यता दिसत नाही. कारण अति बोलणे आणि माती करणे हेच त्यांचे चरित्र आहे. हेच त्यांचे संस्कार...!

@@AUTHORINFO_V1@@