भारतीय प्रशिक्षकांना संधी द्यावी : राहुल द्रविड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |




लखनऊ : टीम इंडियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय अकादमीचा संचालक राहुल द्रविड याने आयपीएलमध्ये भारतीय प्रशिक्षकांना पुरेशी संधी मिळत नाही असे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामाचा लिलाव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ डिसेंबरला कोलकाता शहरात लिलाव पार पडणार आहे. 

भारतीय प्रशिक्षकांना 'सपोर्ट स्टाफ'मध्ये न घेऊन संघ चूक करत आहेत, असे त्याने स्पष्टपणे सांगितले. भारतीय प्रशिक्षक काही कमी नाहीत. भारतीय प्रशिक्षकांना संधी न देऊन आयपीएलचे संघ चूक करत असल्याचेही द्रविड म्हणाला.

माझ्या मते आपल्याकडे काही चांगले प्रशिक्षक आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या क्रिकेटपटूंमध्ये जशी गुणवत्ता आहे तशीच ती प्रशिक्षकांमध्येही आहे. आपण त्यांना आत्मविश्वास देण्याची गरज आहे. आयपीएलमध्ये आपल्या प्रशिक्षकांना संधी मिळत नाहीये हे पाहून मला खरंच वाईट वाटते. भारतीय प्रशिक्षकांना संधी न देऊन संघमालक चूक करत आहेत. असे राहुल द्रविड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला.

राहुल द्रविड लखनऊमध्ये १९ वर्षांखालील भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकदिवसीय मालिका पाहण्यासाठी आला आहे. त्यावेळी त्याने आयपीएलविषयी आपले मत व्यक्त केले.

@@AUTHORINFO_V1@@