आरेमधील मेट्रो-३ कारशेडच्या कामाला स्थगिती : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या 'मेट्रो-३'च्या प्रस्तावित आरे कारशेडला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्याची घोषणा केली आहे. विकासकामांना विरोध नसून आरेतील कारेशडच्या जागेचे सर्वेक्षण करुन त्यानंतर निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या 'मेट्रो-३'च्या कारशेडचा वाद चांगलाच रंगला होता. सत्तेत येण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आरेला जंगल घोषित करुन मेट्रोच्या कारशेडला स्थगिती देणार असल्याचे सांगितले होते. आज मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर ठाकरे यांनी आरे कारशेडसंदर्भात मोठा निर्णय घेतला.

 

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली असून त्यासंदर्भात पुर्नसर्वेक्षण करुनच निर्णय घेण्यात येणार आहे'. तसेच पुर्नसर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत आरेमधील पानालाही हात लावणार नसल्याचे त्यांनी स्षट केले. काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये 'मेट्रो-४' साठी रात्रीच्या वेळी वृक्षतोड करण्यात आली होती. मात्र, रात्रीची वेळेही वृक्षतोड करणे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.



@@AUTHORINFO_V1@@