श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया यांचे राष्ट्रपती भवनात स्वागत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |






नवी दिल्ली : श्रीलंकेत सत्ता हाती घेतल्यानंतर भारत दौर्‍यावर आलेल्या नवनियुक्त राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे आज दिल्लीतील राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत झाले. या दरम्यान पंतप्रधान मोदींनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचीही भेट घेतली.



श्रीलंकेचे अध्यक्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चेचा प्रस्तावही ठेवण्यात आला आहे. या बैठकीत दोन्ही देशांमध्ये संरक्षण
, व्यापार, सीमा वादासह अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. गोटाबाया राजपक्षे हे पदभार स्वीकारल्यानंतर गुरुवारी पहिल्याच विदेश दौर्‍यावर तीन दिवसांसाठी भारतात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून भारतात आलेल्या राष्ट्रपती राजपक्षे यांचे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांनी विमानतळावर स्वागत केले.






राजपक्षे यांचे सचिव पी. बी. जयसुंद्र आणि पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांचे सल्लागार ललित वीरतुंगा हेही त्यांच्यासमवेत भारतात आले आहेत. नवीन श्रीलंकेच्या सरकारबरोबर काम करण्याची तयारीही भारताने व्यक्त केली आहे. गोटाबाया राष्ट्रपती झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती गोटाबाया यांच्या भेटीचा निषेध करण्यासाठी मारुमलार्ची द्रविड मुनेत्र कझागम (एमडीएमके) नेते वाईको यांनी गुरुवारी दिल्लीत समर्थकांसह आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी निदर्शकांना पार्लमेंट स्ट्रीट पोलिस स्टेशनमध्ये नेले.

 

@@AUTHORINFO_V1@@