वीज जोडणीसाठी लाच मागणाऱ्या वर्ग-२ अधिकाऱ्याला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |







एमएसईबीचे सहायक अभियंता राजेश घुले यांच्याविरोधात सापळा रचून कारवाई


कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील कोडोली या ठिकाणी हा प्रकार घडला आहे. तेथील राधाकृष्ण अपार्टमेंट मधील १५ घरधारकांचे वीज जोडणीचे काम एका कंत्राटदाराला मिळाले होते. त्याकरिता एम.एस.ई.बी कार्यालयात जाऊन सहायक अभियंता घुले यांची भेट घेतली. त्यावेळी घुले यांनी प्रत्येकी दोन हजार रुपये लाचेची कंत्राटदाराकाडे मागणी केली. 'जर पैसे मिळाले तरच मी १५ नव्या मीटरची जोडणी करून देईन', असे सांगितले. शेवटी प्रत्येकी दोन हजार देणे शक्य नाही, असे म्हटल्यावर रुपये पाच हजारांवर तडजोड करण्यात आली. घडल्या प्रकाराबाबत कंत्राटदाराने दिनांक २६ नोव्हेंबर २०१९ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज दिला होता.

कंत्राटदार ठरल्याप्रमाणे काल २८ नोव्हेंबर २०१९ रोजी लाच देण्यासाठी म्हणून सहायक अभियंता घुले यांना भेटायला गेले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई रचली होती. घुले यांनी लाच स्वीकारताच त्यांना रंगेहात पाडण्यात आले. संबधित कारवाई पोलीस निरीक्षक श्री, जितेंद्र पाटील, सहायक फौजदार शामसुंदर बुचडे आणी पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने यांनी केली असल्याचे समजते.

@@AUTHORINFO_V1@@