डॉ.प्रियंका रेड्डींना न्याय द्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |


अत्याचारानंतर नराधमांनी जिवंत जाळले

हैद्राबाद : हैद्राबादमध्ये २७ वर्षीय महिला डॉक्टरचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह रंगा रेड्डी जिल्ह्यातील शादनगर परिसरातील चतनपल्ली पुलाखाली सापडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी रात्री ट्रक चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतले आहे. हे दोघेही आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथील रहिवासी आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दूधविक्रेते एस. सत्यम यांना हैदराबाद-बेंगळुरू मार्गावरील उड्डाणपुलाखाली जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत गावातील व्यक्तींना कळवले. गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर सायबराबाद पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती घेतली असता, बुधवारी रात्री शमशाबाद पोलिस ठाण्यात एक डॉक्टर महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. स्कार्फ आणि लॉकेटवरून त्यांनी या मृतदेहाची ओळख पटवली.

डॉ. प्रियंका रेड्डी कोल्लुरूमध्ये पशु चिकित्सक केंद्रात कार्यरत होत्या. बुधवारी कामावरून परतत असताना पार्क केलेली स्कूटी पंक्चर झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी बहिणीला फोन करून सगळा प्रकार सांगितला. एवढेच नव्हे तर आपल्याला भीती वाटत असल्याचे देखील त्या म्हणाल्या. जवळपास फक्त लोडिंग ट्रक आणि अनोळख्या व्यक्ती आहेत, काही लोक आपल्याला मदतीची ऑफर करत असल्याचे देखील त्यांनी बहिणीला सांगितले. पोलिसांना महिला डॉक्टरांच्या बहिणीला दिलेल्या जबाबानुसार, काही वेळाने त्यांनी प्रियंकांना फोन लावला मात्र त्यांचा फोन स्विच ऑफ लागला. घाबरलेल्या कुटुंबियांनी सर्वात प्रथम टोल प्लाझाला प्रियंका यांना शोधण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न निष्फळ झाल्यांनतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

#RIPPriyankaReddy म्हणत नेटकऱ्यांनी केली न्यायाची मागणी...

हैद्राबादमधील या घटनेने महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेवर संपूर्ण हैद्राबादमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियंकाला लवकरात लवकर न्याय मिळावा, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जात आहे. नेटकरी #RIPPriyankaReddy म्हणत डॉ. प्रियंकांना श्रद्धांजली देत, आपला रागही व्यक्त करीत आहेत.

@@AUTHORINFO_V1@@