उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |




मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात चालवल्या जाणाऱ्या सरकारला महाविकासआघाडीचा उपमुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची निवड केली जाणार आहे. तर विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्यात येणार आहे. त्यावर दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद होता. मात्र, त्यावर आता पडदा टाकण्यात आला असून अजित पवार यांच्याबद्दल तूर्त 'वेट एण्ड वॉच' ही भूमीका घेण्यात आली आहे.

 

उपमुख्यमंत्रीपदावर अजित पवार यांनी दावा केला होता. तर विधानसभा अध्यक्षपदावर पृथ्वीराज चव्हाणांनी दावा केला. मात्र, दोन्ही नेत्यांना ही पदे देण्याबद्दल महाविकासआघाडीतील दोन्ही पक्षात एकमत नव्हते. त्यामुळे दोन्ही पक्षांनी तिढा सोडवण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची तर विधानसभा अध्यक्षपदावर दिलीपवळसे पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

 

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात आजपासून पदभार सांभाळणार आहेत. बहुमतचाचणी शनिवारी घेण्यात येणार आहे. त्यापूर्वी महाविकासआघाडीतर्फे हंगामी विधानसभा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रीया पार पाडण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याचे प्रोटेम्ट स्पिकर कालिदास कोळंबकर यांना हटवण्याचा प्रयत्न महाविकासआघाडीतर्फे केला जाणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@