'आज' 'या ठिकाणी' देवेंद्र फडणवीसच 'मुख्यमंत्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |



मुंबई : उद्धव ठाकरे यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रालयातील सत्तासुत्र हलू लागली आहेत. राज्याच्या विकासाचा डिजिटल प्रसार करणाऱ्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही बदल झाले. मात्र, 'सीएमओ महाराष्ट्र' या फेसबूक अकाऊंटवर अद्याप देवेंद्र फडणवीस यांचेच छायाचित्र कायम आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत अकाऊंटवर अद्याप बदल न झाल्याने कमालीचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 
 
 

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत पेजवर फडणवीसच

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सीएमओ ट्विटर आणि फेसबूक अकाऊंटवर राज्य मंत्रीमंडळाचे निर्णय आणि इतर महत्वाची माहिती जाहीर केली जात असे. १८ ऑक्टोबर २०१३ रोजी हे फेसबूक पेज तयार करण्यात आले होते. मंत्रालय मुंबई, असे या फेसबूक पेजचा पत्ता आहे. तसेच मंत्रालयातील दूरध्वनीही या पेजवर देण्यात आला आहे. मंत्रालयातील शासकीय कार्यक्रम तसेच राज्य सरकारमार्फत राबवले जाणारे उपक्रमही यावर शेअर करण्यात येतात. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शपथविधी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीही यावर नव्या मुख्यमंत्री कार्यालयाची कुठल्याही प्रकारची छाप अद्याप तरी नाही.



 

'डिजिटल' शर्यतीत फडणवीस आघाडीवर

दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयातील ट्विटर अकाऊंटबद्दलही वेगळीच चर्चा आहे. ट्विटर अकाऊंटवर यापूर्वी उद्धव ठाकरे यांचा फोटो डीपी म्हणून ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो हटवून मंत्रालयाचा फोटो ठेवण्यात आला. तसेच या ट्विटर अकाऊंटला अद्याप कव्हर पेजही देण्यात आलेले नाही. त्यामुळे ठाकरे सरकार डिजिटल शर्यतीत फडणवीसांच्या तुलनेने अद्याप पिछाडीवर आहेत असेच दिसते.

 

'महाविकासआघाडी' 'अपडेट' नाही

भाजप कार्यालय आणि भाजप नेत्यांनी जितक्या कसबीने 'डिजिटल' यंत्रणा हाताळली तितक्या कुशलतेने राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनेही नव्या माध्यमांचा वापर केलेला नाही. फेसबूक-ट्विटर लाईव्ह, एखाद्या कार्यक्रमाचे अपडेट्स लगेचच करण्यावर भर देण्यात भाजपच्या तुलनेत अन्य कुठल्याही पक्षाला जमलेले नाही. 'महाविकासआघाडी'तही डिजिटल मंचावर फारसा ताळमेळ नसल्याचे दिसून येत आहे.

@@AUTHORINFO_V1@@