अजितदादांचे तळ्यात मळ्यात सुरूच ! उपमुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने नाराजी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |
 

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडीच्या नव्या संसाराच्या दिवसाची सुरुवातच वादाच्या ठिणगीने पडली आहे. एकीकडे काँग्रेसने अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यासाठी विरोध केला आहे, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपद पृथ्वीराज चव्हाण यांना देण्यात येऊ नये यासाठी फिल्डींग लावली आहे. अशाच अजितदादा मात्र, पक्षनेतृत्वावर अजूनही नाराजच आहेत.

 

अजित पवार यांच्यामागे असलेल्या आमदारांचीही नाराजी उघड होत आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद न मिळाल्याने आपली कामेही मार्गी लागण्यात अडचण येतील, अशी भीती अजित पवार यांच्या गटाला आहे. त्यामुळे ते पुन्हा राजकीय भूकंप घडवतील का अशीही भीती महाविकासआघाडीला आहे.

 

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांची सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. अजित पवार जरी महाविकासआघाडीत सारंकाही अलबेल असल्याचे दाखवत असले तरीही त्यांच्या चेहेऱ्यावरील नाराजी उघड दिसत आहे. त्यामुळे राज्याला स्थिर सरकार देऊ पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या अडचणी येत्या काही दिवसातच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव हा शनिवारी मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन भरवण्यात येणार आहे. सर्व आमदारांचा २७ तारखेला शपथविधी झाला होता, आता केवळ विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आणि नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया शिल्लक आहे. राज्यपालांना ३ डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली होती. त्यापूर्वी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सर्व पक्षांचे आमदार गेल्या काही दिवसांपासून मुंबईतच आहेत. त्यांनाही मोकळे करण्याची जबाबदारी तीनही पक्षांवर आहे.




@@AUTHORINFO_V1@@