प्रियांका रेड्डी हत्या प्रकरणात आणखी ४ जण ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2019
Total Views |


 


हैद्राबाद : हैद्राबादमध्ये २७ वर्षीय महिला डॉक्टरचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह रंगा रेड्डी जिल्ह्यातील शादनगर परिसरातील चतनपल्ली पुलाखाली सापडला होता. यासंदर्भात, आधी ट्रक चालक आणि क्लीनरला ताब्यात घेतले होते. त्यानंतरही शुक्रवारी आणखी ४ जणांना ताब्यात घेण्यात आले.

 
 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दूधविक्रेते एस. सत्यम यांना हैदराबाद-बेंगळुरू मार्गावरील उड्डाणपुलाखाली जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यांनी तात्काळ याबाबत गावातील व्यक्तींना कळवले. गावकऱ्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर सायबराबाद पोलिसांनी बेपत्ता व्यक्तींबाबत माहिती घेतली असता, बुधवारी रात्री शमशाबाद पोलिस ठाण्यात एक डॉक्टर महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळवल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. स्कार्फ आणि लॉकेटवरून त्यांनी या मृतदेहाची ओळख पटवली.

@@AUTHORINFO_V1@@