कसा असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा शपथविधी ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |



मुंबई : शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची दादरच्या शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू आहे. या शपथविधी सोहळ्याला राज्यभरातून एक लाख लोक येणार आहेत. शिवसेनेतर्फे सुमारे चारशे शेतकरी कुटूंबियांना निमंत्रण देण्यात आले आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी भव्य असा शिवराज्यभिषेक सोहळ्याचा मंच उभारला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याची छाप या शपथविधी सोहळ्यावर असेल. महाराष्ट्राच्या इतिहासाची भव्यता या सोहळ्याद्वारे मांडण्यात येणार आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्या भेटीला प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली आणि इतर राज्यातील दिग्गज नेतेमंडळी हजर राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शपथविधीला उपस्थित राहणार का याबद्दल अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र, आदित्य ठाकरे यांनी सोनियांची भेट घेऊन या सोहळ्याचे निमंत्रण दिले. तर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोनद्वारे याचे निमंत्रण दिले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

 

शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईत दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील सिद्धिविनायक चौक ते माहीमच्या हरी ओम चौक, राजा बढे चौक ते केळुस्कर मार्ग चौक ले. दिलीप गुप्ते चौक ते पांडुरंग नाईक मार्गाची दक्षिण वाहिनी, गडकरी चौक ते केळुसकर मार्ग (दोन्ही वाहिन्या), एल जे मार्गावरील बाळ गोविंदास मार्ग ते पद्माबाई ठक्कर मार्ग, किर्ती कॉलेज लेनियर काशीनाथ थुरु रोडपी. बाळू मार्ग. प्रभादेवीस, आदर्श नगर, वरळी कोळीवाडा, आरके ४ रोड पाच उद्यान माटुंगा, सेनापती बापट मार्ग, रानडे रोड, पी एन कोटनीस मार्क आदी रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. पश्चिम उपनगरातून येणाऱ्या बसेससाठी सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान, लोढा पार्क येथे, तर हलक्या वाहनांसाठी इंडिया बुल्स सेंटर, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर आणि वर्ल्ड टॉवर्स येथे सार्वजनिक वाहनतळ आरक्षित ठेवण्यात आले आहेत.





@@AUTHORINFO_V1@@