एस.पी.जी. दुरुस्ती विधेयक २०१९ लोकसभेत मंजूर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |


एस.पी.जी.(SPG) अर्थात विशेष संरक्षण गट दुरुस्ती विधेयक २०१९ काल लोकसभेत मंजूर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारी निवासस्थानी राहणाऱ्या त्यांच्या निकटच्या कुटुंबियांना एस.पी.जी. (SPG) सुरक्षा देण्याची तरतूद या विधेयकात आहे.

माजी प्रधानमंत्री, आणि त्यांनी दिलेल्या निवासस्थानी राहणार्‍या त्यांच्या निकटच्या कुटुंबियांनाही एस.पी.जी.(SPG) सुरक्षा पुरवण्याची तरतूद या विधेयकात आहे.

मूळ कायद्यात फक्त पंतप्रधानांसाठी एसपीजी सुरक्षा पुरवण्याची तरतूद होती अशी माहिती गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना दिली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी अधिक सक्षम करणारी सुधारणा या विधेयकात केली आहे असेही ते यावेळी म्हणाले.

@@AUTHORINFO_V1@@