बाळासाहेबांच्या नावापुढून 'हिंदूहृद्यसम्राट' गायब

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |



मुंबई : नुकतेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र, शपथविधीच्या निमंत्रणाकरिता लावलेल्या पोस्टरवरून समाजमाध्यमात चर्चा रंगली आहे. 'हिंदूहृद्यसम्राट' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा कायम बाळासाहेबांचा उल्लेख होत असे. मात्र, आता त्याऐवजी 'वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे' असा उल्लेख असलेले पोस्टर समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करताना आपला हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला सारून धर्मनिरपेक्ष राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. यामुळे अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. सध्या ट्विटरवर #ShivSenaBetrayedMarathaManus या हॅशटॅगचीदेखील चर्चा होत आहे. सोशल मीडियाद्वारे अनेकजण आपला रागदेखील व्यक्त करत आहेत. महाविकासाआघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर करतानादेखील हे सरकार धर्मनिरपेक्षतेवर आधारित असेल असे सांगण्यात आले.

@@AUTHORINFO_V1@@