'चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित ३७७ वेबसाईट काढून टाकण्यात आल्या आहेत' : स्मृती इराणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |





नवी दिल्ली : केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यसभेत सांगितले की, ‘चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित 'अश्लील' कंटेंट पुरविणाऱ्या सुमारे ३७७ वेबसाइट काढून टाकण्यात आल्या आहेत. बालअत्याचाराच्या संदर्भात ५० एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. 'झीरो अवर' दरम्यान अण्णाद्रमुकच्या सदस्या विजीला सत्यानंद यांनी इंटरनेटवर चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित अश्लील सामग्रीसंदर्भात प्रश्न उपस्थतीत केले होते. याला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी असेही सांगितले की, “अशी कोणतीही घटना समोर आल्यास त्याची माहिती त्वरित देण्यात यावी जेणेकरून यावर कारवाई केली जाऊ शकेल.


मोबाइल फोन व इंटरनेटवर चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित सामग्री सहज उपलब्ध झाल्यामुळे बाल अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे विजिला यांनी म्हणाले होते. याचा संदर्भ देताना त्या म्हणाल्या की ,"जवळजवळ दररोज मुलींवर लैंगिक छळ होत असल्याच्या बातम्या येत असतात. इंटरनेटवर अल्पवयीन मुलांना चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित कंटेंट खूप सहज उपलब्ध होत असल्याने,"अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.


पुढे त्या म्हणाल्या की
,''मुलांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या साहित्यापासून दूर ठेवले पाहिजे. त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे परंतु पोर्नोग्राफी साईटवर लहान मुलांना सहज प्रवेश मिळाल्यामुळे त्यांच्या हातून होणारे गुन्हे वाढत आहेत. यावर उत्तर देताना स्मृती म्हणाल्या की ,"चाईल्ड पोर्नोग्राफी संबंधित ३७७ वेबसाइट काढून टाकण्यात आल्या आहेत तर बाल अत्याचाराच्या संदर्भात ५० एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. जर त्यांना अशा घटनांचा तपशील त्वरित देण्यात आला तर त्या अशा घटनांत दोषींवर तातडीने प्रशासकीय कारवाई करेल. विविध पक्षांच्या सदस्यांनी या विषयाशी संबंधित भाष्य केले.

@@AUTHORINFO_V1@@