रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी, तर कर्जमाफीसाठी पुढची तारीख

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |



मुंबई : महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर लगेच कॅबिनेटची बैठक घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत घेतलेल्या काही निर्णयाचा खुलासादेखील केला. यामध्ये ककिल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

 

मात्र, शेतकऱ्यांच्या निर्णयाबाबत माहिती मागितली असून लवकरच मोठ्या निर्णयाची घोषणा करणार असल्याचे मुख्यंमत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. त्यामुळे कर्जमाफीसाठी आणखी २ दिवस शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार असेच चित्र दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडला. त्यापूर्वी महाविकासाआघाडीचा समान किमान कार्यक्रमदेखील जाहीर करण्यात आला.

@@AUTHORINFO_V1@@