अजित पवार अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |




मुंबई : 'महाविकासआघाडी'च्या शपथविधीपूर्वीच नेत्यांमध्ये बंडाचे निशाण उभे राहण्याची शक्यता राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्याभोवती ही चर्चा रंगत आहे. अजित पवार यांनी शरद पवारांची मनधरणी करून उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला असला तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी केली आहे. गुरुवारी सकाळपासूनच ट्विटरवर #AjitPawarForCM हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.

 

अजित पवार गुरुवारी सकाळी नेत्यांच्या संपर्कात नव्हते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी संभाषण केले. यानंतर अचानक मोठी घडामोड घडली आणि त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे महाविकासआघाडीतील नेत्यांनी संकेत दिले. त्यांच्या शपथविधीबद्दल थेट बोलण्यास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी नकार दिला.

 

अजित पवार यांनी पुन्हा एकदा आपली 'बार्गेनिंग पॉवर' दाखवण्यास सुरुवात केली. दुपारी एक वाजता ते 'सिल्वर ओक' या शरद पवारांच्या निवासस्थानी सर्व नेत्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठीही अजित पवार नाराज असल्याचे समजते. त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाची मागणी करण्यात यावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. निवडणूकांपूर्वी अशाच प्रकारे #Aaditya ThackerayforCM  हा ट्रेंड सुरू झाला होता. 






 

 
 
@@AUTHORINFO_V1@@