बंडखोर अजित पवारच उपमुख्यमंत्री ! जयंत पाटलांची शर्यतीतून माघार ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Nov-2019
Total Views |
 
 

मुंबई : 'महाविकासआघाडी'च्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याच्या आनंदात विरजण नको म्हणून आता नाराज राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. जयंत पाटील यांचेही नाव या चर्चेत आहे. त्यामुळे 'महाविकासआघाडी'ला अजूनही अजित पवारांच्या बंडाची भीती वाटल्याने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तरीही राष्ट्रवादीतर्फे जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोन नेते शपथ घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून अद्याप देण्यात आली आहे. 

  

गुरुवारी सकाळी अजित पवार आपल्या निवासस्थानातही उपस्थित नव्हते. त्यांच्याशी संपर्कही होत नव्हता. बहीण खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्याशी काहीवेळाने चर्चा केली. त्यानंतर लगेचच अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजितदादा पवार यांच्या पाठीशी आमदारांचा मोठा गट असल्याने त्यांनी पुन्हा बंड केल्यास महाविकासआघाडीचे सत्तेत राहण्याचे स्वप्न भंगू शकते या भीतीने त्यांना हे पद देण्यात आले आहे का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.




@@AUTHORINFO_V1@@