ऑस्ट्रेलिया परत करणार भारताचा 'हा' सांस्कृतिक ठेवा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली
: ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुधवारी सांगितले की, सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा तीन भारतीय कलाकृती ते भारताला परत करतील. या कलाकृती भारतीय वंशाच्या न्यूयॉर्कस्थित नागरिकाने खरेदी केल्या आहेत. भारत भेटीदरम्यान या वस्तू ते भारताला परत करतील.


पंतप्रधान ‘स्कॉट मॉरिसन’ जानेवारीत भारतात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरीमध्ये सुभाष कपूर नावाच्या व्यक्तीने या कलाकृती खरेदी केल्या होत्या. कपूर यांच्याविरूद्ध भारत आणि अमेरिकेत फौजदारी कारवाई सुरू आहे. गॅलरीद्वारे झालेल्या शोधानंतर त्यांनी या कलाकृती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या कलाकृती १५ व्या शतकातील तामिळनाडूमधील
'द्वारपालाची'जोडी आहे. तर दुसरी कलाकृती ७व्या किंवा ८च्या शतकातील राजस्थान किंवा मध्यप्रदेशमधील 'नागराज' आहे.

@@AUTHORINFO_V1@@