
नवी दिल्ली : बांगलादेशला टी-२० आणि कसोटी मालिकेत धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडीज विरुध्द खेळणार आहेत. यासाठी दोन्ही संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. यामध्ये आता फेरबदल झाले असून भारताचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन या मालिकेला मुकणार आहे. आता शिखर धवनच्या जागेवर संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये ३ टी-२० सामने आणि ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. टी-२० मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना हैदराबाद येथे खेळवण्यात येणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वीच भारताचा सलामीवीर शिखर धवनला दुखापत झाली आहे. यामुळे तो या संपूर्ण मालिकेला मुकणार आहे. शिखरच्या ठिकाणी आता संजू सॅमसनला संघात स्थान मिळाले आहे.
NEWS : @IamSanjuSamson named as replacement for injured Dhawan for the T20I series against West Indies.
— BCCI (@BCCI) November 27, 2019
Wriddhiman Saha undergoes surgery.
More details here - https://t.co/V5fixR8uoH pic.twitter.com/oBsaxVXWAz
शिखर धवनला सय्यद मुस्ताक अली स्पर्धेदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. यामुळे तो विडींज विरुध्दची मालिका खेळू शकणार नाही. शिखर तंदुरुस्त होणार नसल्याने, संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे.