हे अकाऊंट अर्जुनचे नाही, सचिन तेंडूलकरचा खुलासा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |


भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याच्या नावाने ट्वीटरवर फेक अकाऊंट बनवून कोणीतरी त्याची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा खुलासा आज सचिनने केला आहे. त्याने स्वतः त्याच्या अधिकृत ट्वीटरवरून ही माहिती दिली असून ट्वीटरच्या अधिकृत प्रतिनिधींनी याबाबतीत योग्य ती कारवाई करावी अशी विनंती केली आहे.

 

तसेच त्याची मुलगी सारा तेंडूलकर आणि अर्जुन दोघेही ट्वीटरवर नसल्याचे स्पष्टीकरण देखील त्याने यावेळी दिले आहे. त्यामुळे अर्जुनचे ट्वीटरवर असलेले https://twitter.com/jr_tendulkar हे अकाऊंट खोटे असल्याचे देखील त्याने नमूद केले आहे. 

 

 

सोशल मिडियाच्या वाढत्या वापरामुळे आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम बघता अशा घटना होणे ही खूपच गंभीर बाब आहे. याआधी देखील अनेक सुप्रसिध्द आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या बाबतीत अश्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकानेच सोशल मिडीयावर कोणतीही गोष्ट टाकण्यापूर्वी ती अधिकृत आहे ना आणि त्यामागील सत्यता पडताळून पाहणे हे सर्वांसाठीच महत्वाचे असेल.

@@AUTHORINFO_V1@@