केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ६०च !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने एक खुशखबर दिली आहे. कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६० वर्षेच राहणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली. निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरणदेखील दिले आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. "अजून तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, अशी माहिती त्यांनी लोकसभेत दिली आहे.

 

'ग्रुप-अ आणि ग्रुप-बचे कर्मचारी या कक्षेत येतात'

 

"ग्रुप 'अ' किंवा ग्रुप 'ब', स्थायी अथवा अस्थायी स्वरूपात सेवेत असलेले आणि वय वर्षे ३५च्या आधी रूजू झालेले आणि ५० हून अधिक वय असलेल्या कर्मचाऱ्यांना या तरतुदी लागू होऊ शकतात. तर अन्य प्रकरणांत वय वर्षे ५५ पेक्षा अधिक असलेल्या कर्मचाऱ्यांना हे नियम लागू असतील."

@@AUTHORINFO_V1@@