जम्मू : जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल गिरीश चंद्र मुर्मू यांनी पोलीसांना जम्मू काश्मीरच्या सर्व धार्मिक सुरक्षा स्थळांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासह त्यांनी पडझड झालेल्या सर्व प्रार्थना स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी लागणारा खर्च मंजूर करून त्यावर तातडीने कार्यवारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मिरात त्राल येथील एका धार्मिक स्थळावर हल्ला करत आग लावली होती.
सुरक्षा दलाने परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी संपूर्ण भागात नाकाबंदी करण्यात आली आहे.#jammuKashmir #terrorAttack #kashmirUniversity #shrinagar #grenedAttackhttps://t.co/nmRRiGGGFJ
— महा MTB (@TheMahaMTB) November 26, 2019