उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला बंधू राज ठाकरे येणार का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |


मुंबई : महाराष्ट्रात प्रथमच ठाकरे कुटूंबातील मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेणार असल्याने आता त्यांचे बंधू राज ठाकरे हे या शपथविधीला उपस्थित राहणार का याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार यांनी दिलेल्या प्रतिक्रीयेत राज ठाकरे उपस्थित राहील्यास आम्हाला आनंदच होईल, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान आता त्यांना 'मातोश्री'वरून 'कृष्णकुंज'वर शपथविधीचे निमंत्रण जाणार असल्याचे समजते.

 

उद्धव ठाकरे यांच्यातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना होणार आहेत. महाविकासआघाडीच्या बैठकीत त्यांनी यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र, यावेळी त्यांनी मोदींच्या नावाचा उल्लेख न करता आपले मोठे बंधू असा उल्लेख केला होता.

 

महाविकासआघाडीच्या या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही निमंत्रण दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र, सोनिया गांधी या ते निमंत्रण स्वीकारतात का याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. तसेच केंद्रातील अन्य महत्वाच्या काँग्रेसच्या नेत्यांनाही यावेळी निमंत्रण दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन जरी झाले असले तरीही महाराष्ट्रातील राजकारणातील एक वेगळेपण आज विधानभवनात पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्यानंतर जयंत पाटील यांनीही फडणवीस यांच्यासोबत एकत्र त्यांनी विधीमंडळात प्रवेश केला. देवेंद्र फडणवीसही या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




@@AUTHORINFO_V1@@