'सिल्वर ओक' बनले 'सत्ताकेंद्र'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2019
Total Views |




मुंबई : 'महाविकासआघाडी'द्वारे राज्याला उद्धव ठाकरे यांच्या रुपात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मिळाला असला तरीही राज्यातील सत्ताकेंद्र आता 'मातोश्री' ऐवजी 'सिल्वर ओक' हे शरद पवारांचे निवासस्थान बनले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे निर्णय आता शरद पवार यांच्या निवासस्थानाहून घेतले जाणार असल्याचे चित्र आहे. बुधवारी उद्धव ठाकरे 'मातोश्री'हून राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनावर दाखल झाले होते. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट दिली.

 

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही बुधवारी दुपारी सिल्वर ओक येथे बैठक घेतली. यावेळी मंत्रिपदाची शपथ कोण घेणार याबद्दल चर्चा झाल्याचे समजते. अजित पवार यांच्याबद्दलचाही निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. राज्यातील तीन पक्षांच्या सरकारला बांधून ठेवण्यात शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींची सुत्रे आता 'मातोश्री'ऐवजी 'सिल्वर ओक' येथून हलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी झालेल्या महाविकासआघाडीच्या बैठकीतही मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे महाविकासआघाडीचा चेहेरा असतील असा 'सूचना वजा आदेश' पवारांनी दिल्याचा उल्लेख नेत्यांनी केला होता. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असला तरीही या सत्तेचा रिमोर्ट कंट्रोल पवांरांकडेच असल्याचे दिसत आहे.

@@AUTHORINFO_V1@@