
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्त करणार असल्याची घोषणा केलीय आहे. त्यापूर्वीच राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर पुरेसे संख्याबळ नसल्याकारणाने राजीनामा देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. यासर्व घडामोडीनंतर महाविकास आघाडीने सत्तास्थापनेची तयारी सुरु केली आहे. अजित पवार महाविकासआघाडीच्या बैठकीत जाणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. याभेटीत ते सत्तास्थापनेचा दावा करतील. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीची सायंकाळी साडेसहा वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार असून यावेळी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत
यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि ,"शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे
उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तसेच पूर्ण पाच वर्षाचे स्थिर
सरकार स्थापन होईल." उद्धव ठाकरे यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस व
काँग्रेस यांची संमती असल्याचेही त्यांनी
सांगितले.