आज देशभर संविधान दिनाचा उत्साह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |


२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. या निमित्ताने देशभरात विविध चर्चा, परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले आहे. संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारण्याच्या घटनेच्या ७० व्या वर्षानिमित्त देशभरात वर्षभर विविध कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीने तयार केलेले संविधान, २६ नोव्हेंबर १९४९ ला संसदेने स्वीकारले होते, या घटनेला ७० वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहांची एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद या बैठकीला संबोधित करणार आहेत. या बैठकीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज दुपारी दोन वाजता सुरू होईल.

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आज विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष आणि संसदेचे सदस्य या कार्यक्रमात सहभागी होतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही २४ नोव्हेंबर २०१९ ला मन की बातया कार्यक्रमात संविधान दिवसाचा उल्लेख केला होता.

@@AUTHORINFO_V1@@