आता उद्धव ठाकरे होणार मुख्यमंत्री ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणामध्ये गेले काही दिवस चालू असलेल्या सत्तेवर विराजमान होण्यासाठी अनेक चढउतार पाहायला मिळाले. भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा खुर्चीवर कोण बसणार याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर आता बुधवारी महाविकासआघाडीतर्फे मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे हे शपथ घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील हे उपमुख्यमंत्री पदी बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 
सर्वोच्च न्यायालयाने बहुमतचाचणीबद्दल कल दिल्यानंतर आता महाविकासआघाडीने राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार, व्युहरचना आखली जात आहे. राज्यातील या बहुपक्षीय नेत्यांचे नेतृत्व करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला संमती देण्यात आली आहे. मंगळवारी या तिन्ही पक्षांच्या नेत्यांसाठी झालेल्या बैठकीत हा निर्णय़ झाल्याचे बोलले जात आहे.
 
 
देवेंद्र फडणवीस यांनी २३ नोव्हेंबर रोजी अजित पवारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यामुळे शिवसेनेच्या मनसुब्यापर पाणी फेरले होते. बहुमत नसताना देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यावर शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत २४ तासांत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. 
@@AUTHORINFO_V1@@