मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |


 


१ डिसेंबरला शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार


मुंबई : 'ट्रायडंट हॉटेल'मध्ये महाविकासआघाडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावाची एकमताने घोषणा करण्यात आली. या बैठकीत आघाडीतल्या मित्रपक्षांसह ३ पक्षांची 'महाविकासआघाडी'त एकमताने सत्ता स्थापनेसंदर्भात महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.

 

उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान, या बैठकीत महाविकासआघाडीचे 'महाराष्ट्र विकास आघाडी' असे नामकरण करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती मोठ्या पदावर विराजमान होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@