अयोध्या रामजन्मभूमी : सुन्नी वक्फ बोर्डाची फेरविचार याचिका नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |




नवी दिल्ली : अयोध्या रामजन्मभूमी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल न करण्याचा निर्णय सुन्नी वक्फ बोर्डाने घेतला आहे. या निर्णयांनंतर आता अयोध्येतील राममंदिर कोणत्याही वादाशिवाय होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


अयोध्या प्रकरणात एक प्रमुख पक्षकार असलेल्या सुन्नी वक्फ बोर्डाची आज उच्चस्तरीय बैठक झाली. अध्यक्षांसह बोर्डाचे आठ पैकी सात सदस्य बैठकीला उपस्थित होते. त्यात फेरविचार याचिका दाखल न करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अॅड. अब्दुल रझाक यांनी ही माहिती दिली. मुस्लिम पक्षकारांना मशिद बांधण्यासाठी पाच एकर जमीन देण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. त्यावर या बैठकीत कुठलीही चर्चा झाली नाही. केंद्र सरकारने जमिनीबाबत प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल
, असेही रझाक यांनी सांगितले .


काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये झालेल्या बैठकीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने देखील अयोध्या निकालावर फेरविचार याचिका दाखल करण्याचे संकेत दिले होते. सुन्नी वक्फ बोर्डाच्या सदस्यांमध्ये यावरून मतभेद होते. फेरविचार याचिका दाखल करावी
, असं काही सदस्यांचं मत होतं. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री शबाना आझमी यांच्यासह मुस्लिम समाजातील १०० मान्यवरांनी फेरविचार याचिकेला विरोध दर्शवला होता.

@@AUTHORINFO_V1@@