केंद्र व राज्यात 'एक' सरकार नसल्याचा फटका महाराष्ट्राला बसणार का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |


 


मुंबई : राज्याला स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला अपयश आले आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपयशी असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. महाविकासआघाडीच्या सरकारला त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, एकमेकांच्या विरोधात लढलेल्या पक्षांनी एकत्र येत घेतलेला हा निर्णय त्यांच्यावरच उलटणार असल्याची टीकाही फडणवीस यावेळी केली आहे. राज्यात भाजपला थोपवण्यासाठी प्रखर विरोधकांनी ज्या प्रकारे एकत्र येत सरकार स्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार त्यांचे सरकार फारकाळ टीकणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

 

"राज्याने ज्या प्रकारे गेल्या पाच वर्षांत विकासाचा धडाका पाहीला त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सरकारचा मोठा वाटा आहे.", असे फडणवीस म्हणाले. राज्याला मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त मदत आणि प्रक्लप आणण्यात फडणवीस सरकारला यश मिळाले आहे. मात्र, आता राज्यात भाजपचे सरकार नसल्याने त्याचा फटका महाराष्ट्राला बसू शकतो, अशीही शक्यता आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यातील सरकार स्थापन होणार आहे. मात्र, अजित पवारांची भूमीका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 

शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिल्याने राष्ट्रवादीतील एक गट अद्याप नाराज आहे. याचाही फटका प्रस्थापित सरकारला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे सरकार नसलेल्या राज्यात राजकीय विरोधामुळे अनेकदा केंद्र सरकार तयार असूनही राज्यात प्रकल्पांना विरोध झाला. त्यामुळे राज्यातील जनता वेठीस धरली जाते. नव्या सरकारच्या सरकारमध्ये जर एकवाक्यता राहीली नाही तर त्याचा फटका महाराष्ट्राला बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तूळात आहे.

@@AUTHORINFO_V1@@