काश्मीरमध्ये एकाच दिवशी दोन ग्रेनेड हल्ले , सुरक्षा दलांचा हाय अलर्ट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |



अनंतनाग : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलाने हा परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू केली आहे. एका दिवसात दहशतवाद्यांनी केलेली ही दुसरी घटना आहे. यापूर्वी काश्मीर विद्यापीठाच्या बाहेर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. यात दोन स्थानिक नागरिक जखमी झाले. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


काश्मीर विद्यापीठाजवळ ग्रेनेड हल्ला


मंगळवारी सकाळी काश्मीर विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात दोन स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाने परिसर घेरला असून शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी संपूर्ण भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी हा हल्ला संशयास्पद असल्याचे सांगितले आहे. दुपारी गर्दीच्या वेळी हा हल्ला करण्यात आला.
;


यापूर्वी ४ नोव्हेंबरला दहशतवाद्यांनी श्रीनगर शहरातील गर्दी असलेल्या हरीसिंग स्ट्रीट येथे ग्रेनेड हल्ला केला होता. त्यात एक खेळणी विक्रेता ठार झाला
, तर ३८ लोक जखमी झाले. मात्र, घटनेत जखमींची संख्या 15 असल्याचे पोलिसांनी सांगितले. संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.


दहशतवादाविरूद्ध केंद्र सरकारच्या शून्य सहिष्णुतेचे धोरण आणि काश्मीरमधील बदलत्या परिस्थितीमुळे दहशतवादी अशा घटना घडवून आणत आहेत. दहशतवादी लोकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी अशा घटना घडवून आणत आहे. कालच जम्मू-काश्मीर पोलिसांनी अशा प्रकारचे हल्ले होऊ शकतात या संबंधीची अॅडव्हायजरी जारी केली होती.

@@AUTHORINFO_V1@@