नव्या सरकारचा शपथविधी संपन्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |





नव्या विधानसभेचे उद्या गठन
, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी


मुंबईमहाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन मंगळवारी सुरू झाले. कोळंबकर यांनी सर्व २८८ आमदारांना शपथ देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेत सर्व आमदारांचे स्वागत केले. सुप्रिया सुळे यांनी बंधू अजित पवार यांची गळाभेट घेतली.

 

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला. त्यानुसार आज सर्व आमदारांचा शपथविधी पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता शिवाजी पार्कवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यावेळी काही मंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार आहे.


राज्याच्या नव्या विधानसभेचे गठन झाले असून बुधवारी सकाळी ८ वाजता सर्व नवनिर्वाचित आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिल्या. नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीही पार पडला. याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक राजभवनातून जारी झाले होते. नवनिर्वाचित आमदारांना सकाळी विधानभवनात उपस्थतीत राहण्याचे आमंत्रण यात देण्यात आले.







राज्यपालांनी मंगळवारी संध्याकाळीच विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती केली आहे. कोळंबकर यांचा शपथविधी संध्याकाळीच पार पडला. त्यामुळे आता उद्याच कोळंबकर हे सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी घेतील. सकाळी सर्वोच्च न्यायालयाने बहुमत चाचणीबाबत दिलेल्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा वेग आला. उद्या संध्याकाळी ५ वाजेपर्यंत भाजप सरकारला बहुमत चाचणीसाठी वेळ देण्यात आला होता. परंतु तत्पुर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता उद्या नवनिर्वाचित आमदारांसोबत नव्या मुख्यमंत्र्यांचाही शपथविधी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

@@AUTHORINFO_V1@@