बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |



नवी दिल्ली –
न्यायमूर्ती एम. व्ही. रमण्णांनी निकालाच्या वाचनाची सुरुवात केली असून, लोकशाहीच्या मूल्यांच रक्षण व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. उद्या पाच वाजेपर्यंत बहुमताची चाचणी घेण्यात यावी आणि ही चाचणी गुप्त मतदानाने होता ती थेट प्रक्षेपित व्हावी असा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. शिवाय उद्या संध्याकाळपर्यंत आमदारांचा शपथ विधी व्हावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. हंगामी अध्यक्षच बहुमत चाचणी घेतील, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले आहे. 

महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता आदेश दिले. दोन्ही बाजूंकडून सोमवारी सकाळी दीड तास चाललेल्या सुनावणीनंतर, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

बहुमत नसताना घाईघाईने शपथविधी सोहळा उरकण्यात आला आहे. त्यामुळे विश्वासमताची तारीख लवकरात निश्चित करण्यात यावी, अशी मागणी करत या तिन्ही पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

@@AUTHORINFO_V1@@