भाजप बहुमत चाचणीसाठी तयार – चंद्रकांतदादा पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |


महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या सत्तास्थापनेचा पेचप्रसंग आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार उद्या संध्याकाळी या प्रश्नाचे उत्तर उलगडेल का याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान आज भारतीय जनता पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘भाजप बहुमत चाचणीसाठी तयार’ असल्याचे सांगितले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

उद्या संध्याकाळी ५ वाजता थेट प्रक्षेपणाद्वारे या बहुमत चाचणीचे सर्वच जण साक्षीदार असणार आहेत. महाआघाडी आणि भाजप यांच्यातील सत्तेची ही चढा-ओढ अखेर उद्या संपेल अशी आशा आहे आणि महाराष्ट्राला एक स्थिर सरकार मिळून, लोकशाही अबाधित राहील अशी इच्छा प्रत्येकाकडूनच व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्तास्थापनेसाठी आता काहीच अवधी शिल्लक आहे. या  पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून अतिशय ठामपणे आणि विश्वासाने आपण सत्तास्थापन करू याची खात्री व्यक्त केली जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@