शबरीमला मंदिरात बिंदू अम्मिनी यांच्यावर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |



कोची : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करणाऱ्या बिंदु अम्मिनी यांच्यावर मंगळवारी एका व्यक्तीनं हल्ला केला. पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाजवळ असताना अम्मिनी यांच्यावर मिर्ची स्प्रेने हल्ला करण्यात आला. बिंदु कारमधून उतरताच त्या व्यक्तीनं त्यांच्यावर मिर्ची स्प्रे मारला. दरम्यान बिंदु यांना उपचारासाठी एर्नाकुलममधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्रीनाथ पद्मनाभन असं ताब्यात घेतलेल्या हल्लेखोराचं नाव असून तो कन्नूरचा रहिवासी आहे.



या वर्षी सुरुवातीलाच बिंदु अम्मिनी यांनी एका महिलेसोबत शबरीमला मंदिरात प्रवेश करून भगवान अय्यप्पाचं दर्शन घेतलं होतं. तृप्ती देसाई आणि त्यांच्यासोबतच्या महिला सकाळीच कोचीमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांच्या भेटीसाठी बिंदू तिथे पोहचल्या होत्या. तृप्ती देसाईसोबत बिंदुही मंदिर प्रवेश करणार होत्या.

बिंदु यांनी सरकारकडे मंदिरात प्रवेश करून दर्शन घेण्यासाठी परवानगी मागितली होती. शबरीमला दर्शन हा आमचा अधिकार आहे. आम्हाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही असं सरकारनं आता लेखी स्वरूपात द्यावं, तेव्हाच आम्ही परत जाऊ, असा पवित्रा आता बिंदु यांनी घेतला आहे.

@@AUTHORINFO_V1@@