संवेदनशीलता : भाग ३

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2019
Total Views |




‘संवेदनशीलता’ हा माणसाचा मूलभूत गुणधर्म आहे. शरीराचे सर्व कार्य या गुणधर्मानुसार चालत असते. शरीराच्या सर्व नियमित क्रिया जसे पचनक्रिया, वाढ होणे चयापचय इ. तसेच जंतुसंसर्ग आजार होणे इ. शरीराच्या सर्व प्रतिक्रिया हा माणसाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेला भाग असतो.


संवेदनशीलता
हा मुख्य गुण चेतन व अचेतन वस्तूंमधील फरक दर्शवत असतो. संवेदनशीलता जाणून घेणे चिकित्सकासाठी फार महत्त्वाचे असते. कारण, या संवेदनशीलतेचा रुग्णाच्या संपूर्ण आयुष्यभर परिणाम होत असतो. म्हणून त्याचा अभ्यास हा खालील प्रकारे केला जातो.


) आरोग्याच्या देखभालीसाठी

) व्यक्तिमत्त्वाच्या उत्क्रांतीसाठी

) रोगप्रवृत्ती जाणण्यासाठी (Diathesis)

) रोग प्रकटीकरण जाणण्यासाठी

) रोगाचा प्रादुर्भाव जाणण्यासाठी

) रोगमुक्ततेची प्रक्रिया जाणण्यासाठी

) औषधांच्या लक्षणांची व्यापती शोधण्यासाठी

) औषधांच्या लक्षणांची प्रतिक्रिया अभ्यासण्यासाठी

) औषधाची मात्रा व त्याची पुनरावृत्ती कशी करायची याचा अभ्यास करण्यासाठी


‘संवेदनशीलता’ हा माणसाचा मूलभूत गुणधर्म आहे. शरीराचे सर्व कार्य या गुणधर्मानुसार चालत असते. शरीराच्या सर्व नियमित क्रिया जसे पचनक्रिया, वाढ होणे चयापचय इ. तसेच जंतुसंसर्ग आजार होणे इ. शरीराच्या सर्व प्रतिक्रिया हा माणसाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियेला भाग असतो. (Reaction to the stimulus)



आरोग्याची देखभाल


शरीर व मनाचा आणि त्याच्या सर्व क्रियांचा योग्य समतोल साधणे म्हणजेच आरोग्य राखणे होय
. शरीर व मनाला सतत कुठल्या ना कुठल्या ताणाला सामोरे जावे लागते. परंतु, निरोगी चैतन्यशक्ती सर्व शरीराचे कार्य सुरळीत चालू ठेवते. हे कार्य सुरळीत चालते. कारण, बाह्य प्रेरणेला शरीराने दिलेला प्रतिसादसुद्धा ‘नॉर्मल’ असतो. त्यामुळे माणूस आजारी पडत नाही.


) व्यक्तिमत्त्वाच्या उत्क्रांतीचा अभ्यास- शारीरिक व मानसिक ठेवण ही जनुकीय ठेवणीप्रमाणे असते. तसेच ही ठेवण पर्यावरण व वातावरणातील बदलांवरही अवलंबून असते. या बदलांना शरीराने व मनाने दिलेला प्रतिसाद हा किती यशस्वीरित्या किंवा किती अपुरेपणाने दिला गेला आहे, त्यावर शरीराची संवदेनशीलता कशी आहे, याचा अंदाज येतो.


) रोगप्रवृत्ती जाणण्यासाठी - एखादा विशिष्ट आजार होण्यासाठी पूरक अशी शारीरिक व मानसिक ठेवण व रोग होण्याअगोदर शरीराची रोगप्रवृत्ती याचा अभ्यास फार महत्त्वाचा असतो. यालाच ‘study of Diathesis’ असे म्हणतात.



शरीराची ठेवण व ठराविक गुणधर्म तपासले असता असे लक्षात येते की
, एखाद्याची शारीरिक ठेवण व लक्षणे काही ठराविक आजार होण्यासाठी पूरक आहेत. उदा. वातावरणातील थोड्याबदलाने जर एखाद्या माणसाचे सांधे आखडून जात असतील तर त्याची वातप्रवृत्ती असते, हे आपण जाणतो व अशाप्रवृत्तीच्या माणसाने खर वेळीच काळजी घेतली तर त्याला पुढे जाऊन होणारा संधिवात टाळता येतो. ‘Diathesis’चा अभ्यास करताना कुठल्या दोषाकडे संवेदनशीलता जास्त आहे, हे आपणास कळून येते व त्याच्या अभ्यासामुळे मग चिकित्सकाला औषध देताना व ‘केस टेकिंग’नंतर रुग्णाचे वैयक्तिकीकरण करण्यास फायदा होतो. रुग्णाची ही संवेदनशीलता आजारात कशी प्रतिक्रिया देते व कमी व जास्त संवेदनशीलतेचा शरीर व मनावर कसा परिणाम होतो, हे आपण पुढील भागात जाणून घेऊया.

(क्रमश:)



-डॉ. मंदार पाटकर

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@