याच जन्मात भोगायचं आहे : शालिनी पाटीलांचा पवारांवर वार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |


 


काकांनी पेरलं तेच उगवतंय  : शालिनी पाटील 


मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्ममंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ४१ वर्षांपूर्वीची एक घटना स्मरण करून दिली. अजित पवार हे राष्ट्रवादीत जाणे म्हणजे तुम्हाला एक धडा असल्याचे त्या म्हणाल्या. ज्या प्रमाणे पवारांनी १९७८ मध्ये त्यावेळी पाठीत सुरा खुपसला होता. आज तुमचे पुतणे अजित पवार त्याचा हिशोब चुकता करत आहेत. शालिनी पाटील यांनी वेळोवेळी पवारांना यापूर्वीही त्यांच्या राजकारणावरून लक्ष्य केले होते.

 

शरद पवारांनी वसंतराव पाटील यांच्या काळात आमदार फोडण्याचे काम केले होते. पवार वसंतरावांशी चर्चा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी त्यांनी दगाफटका केला. त्यामुळे त्यांनी केलेल्या कारस्थांनांची शिक्षा त्यांना आज मिळत असल्याची भावना शालिनी पाटील यांनी व्यक्त केली. अजित पवारांची आजची भूमीका ही त्याचीच द्योतक असल्याचा टोलाही त्यांनी पवारांना लगावला आहे.

 

महाराष्ट्रात फेब्रुवारी १९७८मध्ये काँग्रेस सोशलिस्ट ६९ तर काँग्रेसचे ६५ आमदार निवडून आले होते. जनता पक्षाचे ९९ आमदार निवडून आले होते. कुठल्याही पक्षाला ठोस बहुमत मिळाले नव्हते. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन वसंतदादा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी ३८ आमदार फोडून ते वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यांचे सरकार दोन वर्ष टीकले होते.




 

@@AUTHORINFO_V1@@