भाजप जे बोलते ते करून दाखवते : नरेंद्र मोदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Nov-2019
Total Views |



राम मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर घणाघात

डाल्टनगंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी डाल्टनगंजमध्ये झारखंड निवडणूक सभेत विरोधकांवर तुफान हल्ला चढवला. झारखंडमधील जनतेला संबोधित करतांना पंतप्रधान मोदींनी काश्मीरच्या कलम ३७० आणि अयोध्या राममंदिर वादाचे मुद्दे अधोरेखित केले. भाजप जी आश्वासने देते ती पूर्ण करते, तर उर्वरित पक्ष मुद्दे लांबवत आपली मतपेटी भरतात.असा घणाघात त्यांनी यावेळी केला. यापूर्वी २१ नोव्हेंबर रोजी झारखंड येथे झालेल्या निवडणूक सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही राम मंदिराचा उल्लेख केला होता.

'भाजपने जी काही आश्वासने व घोषणा दिल्या आहेत, त्या कितीही कठीण असल्या तरी आम्ही एकामागून एक पूर्ण करत आहोत. सर्वांना समस्या आहेत आणि आपल्याकडे तोडगा आहे.असे मोदी यावेळी म्हणाले. तर समस्यांकडे दुर्लक्ष करून, त्यांच्यावर मत मागणे ही काँग्रेसची कार्यप्रणाली आहे. म्हणूनच काँग्रेसने कलम ३७०चा मुद्दा लटकविला. रामजन्मभूमीचा वादही या लोकांनी अनेक दशकांपासून ताटकळत ठेवला होता. काँग्रेस तोडगा काढू शकली असती परंतु त्यांनी तसे न करता आपल्या मतांचा विचार केला आणि देशाचे आणि समाजाचे नुकसान केले, असा आरोपही त्यांनी केला.

नवीन सरकारने झारखंडसाठी सामाजिक न्यायाच्या पाच स्त्रोतांवर काम केले आहे. झारखंडला नक्षलवाद आणि गुन्हेगारीपासून मुक्त करण्यासाठी, भयमुक्त वातावरणासाठी भाजपने नेहमीच प्रयत्न केले आहेत. असं ही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

२०२०पर्यंत म्हणजे देशाच्या ७५ व्या स्वतंत्र दिनी सगळ्यांकडे हक्काचे घर असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आयुषमान योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबासाठी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले. झारखंड राज्यात ३० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार असून, २० डिसेंबरपर्यंत पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत, तर २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.

@@AUTHORINFO_V1@@